Dharavi Latest News : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर धारावीचा पुनर्विकास करण्याचे स्वप्न मागील कित्येक वर्षांपासून धारावीकरांना दाखविले जात असून आता पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा भूभाग निकटवर्तीयांच्या घशात घालून दोन लाख करोडचा घोटाळा करण्याचे षडयंत्र भाजपा - शिंदे सरकार रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेणन यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले.


धारावी पनर्विकास प्रकल्पात घोटाळ्याचे आरोप काय ? 


एकूण 512 एकर जमीन आहे, त्यातील काही जमिनींवर विकास करणार आणि बाकीची जमिन विकण्याचा इरादा आहे. त्यात २ लाख करोडचा हा घोटाळा होईल. 
Drp च्या प्रोजेक्ट मध्ये लोकांच्या रोजगाराचा प्रयोजन केलेले नाही. 80 टक्के रोजगार धारावीकरांचं त्याच ठिकाणी आहे.
धारावीच्या लोकांना एका जागी वसवून सर्व बाकीच्या जागा खासगी बिल्डरांना देणार असे आरोप
एका खासगी कंपनीला हा सर्व प्रोजेक्ट देणार अणि लूट करणार असे आरोप
धारावीचा पुनर्विकास हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या फंडामार्फत केले पाहिजे , ते न करता स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना मालामाल करण्याचा प्रयत्न


धारावी पुनर्विकास खासगी कंपन्यांकडून झाला तर काय नुकसान होइल ?
धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यान जे मिठीच्या जैवविविधतेचे संरक्षक आहे. त्याची हानी होईल 
माहीम बांद्रा खाडी नष्ट होईल. तेथे काँक्रीटीकरण प्रचंड होणार आहे. 
आजूबाजूच्या भागांना मुंबईच्या पुराच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल.
छोट्या मोठ्या उद्योगांचे फार मोठे नुकसान होईल रोजगाराचा प्रश्न उभा राहील
कोणत्याही सोयी सुविधा धारावीकरांना मिळणार नाहीत.
ज्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्या खाजगी बिल्डरांना मिळतील.


धारावी पुनर्विकास प्रकल्प कसा आहे?
धारावी पुनर्विकास प्रकल्पात २०३४ च्या डीसीपीआर ३३ (१०) (ए) नुसार धारावीचा व्यावसायिक आणि निवासी रिअल इस्टेटमध्ये प्रस्तावित विकास, यात केवळ झोपडपट्टीचाच समावेश नाही तर सरकारी जमिनीचाही समावेश आहे, जसे की बेस्ट डेपो तसेच अतिसंवेदनशील महाराष्ट्राची मिठी नदी आणि माहीम खाडीच्या संगमावर वसलेले निसर्ग उद्यान, वनस्पती असून हा भाग ५१२ एकर म्हणजे २ कोटी २५ लाख २८ हजार चौरस फूट आहे. यांचे बांधकाम क्षेत्र ९,०१,१२,००० चौरस फूट इतका धारावी परिसर व्यापलेला आहे.


धारावीचा नाव पुसण्याचा डाव आहे, आपचा आरोप
आताच्या घडीला धारावीत दहा लाख लोक राहतात. धारावीत मोठ्या संख्येने छोटे-मोठे व्यवसाय असून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या व्यक्ती धारावीत स्थिरावल्या आहेत.  यांच धारावीची ओळख पुसळ्यासाठी हा प्रकल्प भाजप शिंदे सरकार आपल्या निकटवर्तीयांच्या घशात घालू इच्छीते आहे. त्यांच्या हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे मत पत्रकार परिषदेत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केलं. 


पुढे बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, धारावीचा विकास हा  भाजपाच्या आवडत्या मित्रांकडे जाईल. किंबहुना सल्लागार नेमण्यासाठीही बैठकीत गुजरातमधील सल्लागाराला पसंती देण्यासाठी जाचक अटींवर पाणी टाकण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपा मुंबईकरांच्या रक्ताने आपले खिसे भरून फक्त स्वत:साठी आणि आपल्या साथीदारांसाठी पैसे कमविण्याशी संबंधित आहे, परंतु आम आदमी पार्टी त्यांच्या दुष्ट अजेंड्याला प्रत्येक टप्प्यावर विरोध करेल,  असे आज पत्रकार परिषदेत मेनन यांनी सांगितले.