हेडलाईन्स


 

पिपंरी-चिंचवड : देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक, उर्वरित आरोपी फरार

 

दुष्काळ निवारणासाठी 5 हजार कोटींचं कर्ज काढणार, महाराष्ट्र सरकारने परराष्ट्र मंत्रालयामार्फत जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवला

 

मुख्यमंत्र्यांसोबत श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळाची बैठक, समन्यायी पाणीवाटपासंदर्भात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अहवाल द्या, मुख्यमंत्र्यांचे सचिवांना आदेश

 

2006 च्या मालेगाव स्फोट प्रकरणी 8 मुस्लिम युवकांची निर्दोष मुक्तता

 

सतिश माथुर यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या महासंचालकपदी नियुक्ती

 

डान्स बार पुन्हा सुरु करण्यासाठी बंदी घालू नका, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे

 

सोलापूर : गणेश कुलकर्णी खून खटल्यातील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता

 

शिर्डी : अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पेटवले, राहुरी तालुक्यातील घटना

------------------------------

आयसिसमध्ये भारतीय तरुणांची भरती करणारा मोहम्मद शफी ठार, सीरियात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात शफीचा खात्मा http://goo.gl/M90jnO

------------------------------

1. रोहित, हार्दिक, कन्हैया देशातील तरुणांचे हिरो, उद्धव ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर, तर हल्ले करुन कन्हैयाला हिरो बनवू नका, आठवलेंचा सल्ला

------------------------------
2. मुंबईपाठोपाठ पुण्याच्या सभेतही कन्हैयाची मोदी आणि संघावर टीका, तर विमानात कन्हैयावर हल्ला झालाच नसल्याचा पोलिसांचा दावा

-------------------------------
3. वेगळ्या विदर्भाचं आंदोलन वेळप्रसंगी हिंसक होऊ शकतं, श्रीहरी अणेंचा सरकारला इशारा, अकोल्यातील प्रसंगावरुन शिवसेनेवरही बोचरी टीका

--------------------------------
4. यापुढे युती करायची की नाही ही शिवसैनिकच ठरवतील, नाशकात उद्धव ठाकरेंचा भाजपला सूचक सल्ला, पालिकेसाठी एकला चलो रे ची तयारी

---------------------------------
5. दारुकंपन्यांच्या पाणीपुरवठ्याविरोधात आज सरकार कोर्टात बाजू मांडणार, कोर्टाच्या कडक पवित्र्यानंतर सरकारची नरमाईची भूमिका

----------------------------------
6. वाढलेल्या अबकारी कराविरोधात राज्यातले सराफ व्यावसायिक आजपासून पुन्हा संपावर, मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला निर्वाणीचा इशारा

----------------------------------
7. सोलापुरातून पुन्हा तब्बल दोन टन एफिड्रिन जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे २०० कोटींची किंमत

-----------------------------------
8. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात, उत्तराखंड राष्ट्रपती राजवट, दुष्काळाच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक

------------------------------------
9. पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान, परगणा जिल्ह्यात 24 तर हावड्यात 49 जागांसाठी मतदान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

------------------------------------
10. संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात 'एबीपी माझा'ची बाजी, सर्वोत्कृष्ट वृत्तवाहिनीसह कथाबाह्य कार्यक्रमाच्या पुरस्कारावरही मोहोर