मुंबई : राजकीय वर्तुळात आपल्या खास स्टाईलमुळे आणि आक्रमक वृत्तीमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. याचदरम्यान, छगन भुजबळांचा एक कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत भुजबळ पूर्णपणे थकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. मात्र, हा फोटो भुजबळांचाच आहे का, इथपासून शंका आहे.


 



 

हा फोटो व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमागचं सत्य अजून समोर आलं नाही. हा फोटो कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

 

मात्र, भुजबळांना मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असतानाचा हा फोटो असल्याचे सोशल मीडियावर फिरत आहे. हा फोटो नक्की हॉस्पिटलमधील आहे का किंवा हा फोटो भुजबळांचाच आहे का, याबाबत दुजोरा मिळालेला नाही.

 

 

गेल्या सोमवारी भुजबळांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने तातडीने मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. भुजबळांना उच्च रक्तदाब अर्थात ब्लडप्रेशरचाही त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळचा त्यांचा हा फोटो आहे का, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.

 

 

दरम्यान, भुजबळांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.