LIVE : भाजप नेत्या किरण बेदी पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदी
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2016 02:13 AM (IST)
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर भिक्षा मागणाऱ्या मुलाच्या हातात 4 डिटोनेटर सापडले, बॉम्ब पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल ------------------------------------------ मुंबईतील जोगेश्वरी, मालाडमध्ये पावसाची रिमझिम, मुंबईकरांना काही मिनिटांसाठी सुखद गारवा ------------------------------------------ ‘एव्हरेस्ट’ सर करणाऱ्या रफिक शेख यांच्या पायाला हिमदंश, काठमांडूतील रुग्णालयात उपचार सुरु, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचं एक पथक दिल्लीला रवाना ------------------------------------------ मुंबई : भाईंदरमधील उत्तन परिसरातील कचरा डेपोला आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल, परिसरात धुराचं सम्राज्य ------------------------------------------ भाजप नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदी निवड ------------------------------------------ नवी मुंबईत इमारतीवरुन कोसळून तरुणाचा मृत्यू, कोपरखैरणे सेक्टर 19 मधील घटना ------------------------------------------ 1. 'त्या' नंबरवर कोणताही कॉल नाही, दाऊद कॉल प्रकरणी पोलिसांचा खडसेंना दिलासा, कसून चौकशी करण्याची 'आप'च्या प्रीती मेनन यांची मागणी -------------- 2. केबीसी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी नांदेड पोलिसांच्या ताब्यात, 28 मेपर्यंत पोलीस कोठडी ---------------------- 3. पराभवामुळे खचू नका, कोणताही पराभव कायमचा नसतो, 2 राज्य गमावल्यानंतर सोनिया गांधींकडून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न ----------------------- 4. अमेरिकेच्या हवाई हल्लात मुल्ला अख्तर मंसूर ठार झाल्याची शक्यता, पाकिस्तान आणि अफगाणच्या सीमेवरील हल्ल्यात खात्मा, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती ---------------------- 5. दादरा आणि नगर हवेलीच्या सिल्व्हासात उन्हाचा कहर, रस्त्यावरचं डांबर वितळल्यानं पायी चालणाऱ्यांची कसरत --------------------- 6. रुद्रप्रयागवर पुन्हा निसर्ग रुसला, जयमंडी परिसरात ढगफुटी, रुद्रप्रयाग-बद्रीनाथ हायवेवर मातीचा खच, भाविकांचा खोळंबा ------------------- 7. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड निश्चित, अध्यक्षपदासाठी फक्त एकमेव अर्ज -------------------- 8. महाराष्ट्र पोलिस सेवेतले आयपीएस अधिकारी सोहिल शर्मांकडून एव्हरेस्ट सर, मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाचा वर्षाव ----------------- 9. एअर इंडियाकडून प्रवाशांना हवाई सफरीची शानदार ऑफर, अवघ्या 1499 रुपयात करता येणार तिकीट बूक