हेडलाईन्स :


मुंबई : एअर इंडियाच्या मुंबई-गोवा फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना दुसऱ्या फ्लाईटने पाठवलं

-----------------------

कॉल रेकॉर्डच्या तपासाअंती खडसेंना क्लीन चिट, सप्टेंबर-एप्रिलदरम्यान खडसेंना कॉल्स नाहीत, अतिरिक्त पो. आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णींची माहिती

-----------------------

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची निवड निश्चित, ठाकूर यांना पूर्व विभागाच्या सहाही संघटनांचा पाठिंबा

-----------------------

एकनाथ शिंदे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, हितेंद्र ठाकूर यांची भेट, ठाणे जिल्हा विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकूरांना साकडे

-----------------------

मुंबई-गोवा हायवेवर पेण-हमरापूर दरम्यान वाहतूक कोंडी, 3 ते 4 तासांपासून वाहतूक खोळंबली

-----------------------

 


गोंदिया : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंच्या गाडीला अपघात, बडोले थोडक्यात बचावले, अंगरक्षक आणि पीए किरकोळ जखमी

-----------------------



1. अध्यादेश काढून 'नीट'ला केंद्राचा बाहेरचा रस्ता, राज्यांमधील मेडिकल प्रवेश सीईटीनुसार, संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट सरकार विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार

-----------------------
2. केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे संकेत, 11 आणि 12 जूनला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, काही मंत्र्यांना पक्षसंघटनेत धाडण्याची शक्यता

----------------------
3. 26/11 हल्ल्याचा सुत्रधार लख्वीसह 7 दहशतवाद्यांविरोधात हत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, पाकिस्तान कोर्टाचा निर्णय, मात्र उलटतपासणीस नकार

-----------------------
4. योग दिवसाला ओमकारचा घोष बंधनकारक नाही, वाद टाळण्यासाठी केंद्राचं एक पाऊल मागे, 45 मिनिटांचा कार्यक्रम जाहीर

-------------------------
5. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाला एकटे राहुल गांधी जबाबदार नाहीत, दिग्विजय सिंहांचं वक्तव्य, काँग्रेसला सर्जरीची गरज असल्याचंही मत

---------------------
6. केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्याच पत्रकार परिषदेत तीन वेळा बत्तीगुल, बहुत काम बाकी है म्हणत पियुष गोयल यांनी वेळ मारुन नेली

-------------------
7. संदीप सावंत मारहाणप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावताच निलेश राणेंना पोटदुखी, तुरुंगवास टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल

------------------
8. लिमोझिनचे पुरावे न दिल्यानं दमानियांना अब्रूनुकसानीची नोटीस, एकनाथ खडसेंची माहिती, तर काँग्रेसला मीडियासमोर तोंड काळं करण्याचा सल्ला

------------------
9. अमेरिकेतील व्हाईट हाऊस बाहेर अज्ञाताकडून गोळीबार, हल्लेखोराला अटक