1. बांद्यातून येणारा मान्सून यंदा चांद्यातून आला, 10 वर्षानंतर पूर्व विदर्भातून एन्ट्री, 48 तासात महाराष्ट्रावर आभाळमायेचं भाकित


------------------

2. शिवसेनेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण, सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त राज्यभर भव्य कार्यक्रम, गोरेगावच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे संबोधित करणार

---------------------------

3. आरोग्यमंत्री दीपक सावंतांच्या खासगी सचिवांवर गंभीर आरोप, बदल्यांसाठी सुनील माळींनी लाच घेतल्याप्रकरणी सीएमकडे तक्रार, तर महिलेचा अश्लील संभाषणाचा आरोप

-------------------------

4. भाजप कार्यकारिणीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा, नेत्यांची धाकधूक वाढली, आजच्या समारोपाला नितीन गडकरी हजेरी लावणार

-----------------------------

5. एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन, राज्याच्या कार्यकारिणीत मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण, राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढण्याचं आवाहन

--------------------------

6. पोलिसांच्या मनमानी कारभारला सरकारचा चाप, तक्रार नोंदवल्यानंतर तीन आठवड्यात कारवाई, तक्रारदाराला माहिती कळवणं बंधनकारक

--------------------------------

7. वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांडानं कल्याण हादरलं, नणंद-भावजयची निर्घृणपणे हत्या, चोरीच्या उद्देशानं हत्येचा संशय

-------------------

8. दोन हजार कोटीच्या ड्रग तस्करीमागे ग्लॅमरस ममता कुलकर्णी, सोलापूरच्या एवॉन फार्मातला साठाही ममता आणि पती विक्की गोस्वामीचा, ठाणे पोलिसांचा दावा

-----------------

9. आरबीआयची दुसरी टर्म स्वीकारणार नाही, रघुराम राजन यांची पीटीआयला मुलाखत, स्वामी आणि भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राजन यांची प्रतिक्रिया

------------------------

10. जागतिक योग दिनाची देशभरात जोरदार तयारी, रामदेव बाबांच्या उपस्थितीत राजपथावर 35 हजार नागरिक योगाचा सराव करणार, केंद्रीय मंत्री अरुण जेटलीही हजेरी लावणार