तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या चेन्नईला जाणार, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल चेन्नईत हजर राहणार
-----------------------------------------------
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या होणारी पहिली प्रचार सभा पुढे ढकलली, मुंबईतील चारकोप येथे होणार होती सभा
-----------------------------------------------
औरंगाबाद : गुलमंडीत भाजपचं आंदोलन, अजित पवार आणि धनंजय मुंडेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
-----------------------------------------------
शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री 10 वाजता भेट
-----------------------------------------------
नाशिक : एबी फॉर्मसाठी पैसे घेतल्याचे प्रकरण, निवडणूक आयोगाचं 6 जणांचं पथक भाजप कार्यालयात दाखल
-----------------------------------------------
मुंबई - शिवसेना नगरसेविकेचं लाचखोरी प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाकडून हेमांगी चेंबुरकर आणि त्यांच्या पीएला शनिवारपर्यंत एसीबी कोठडी
-----------------------------------------------
रिझर्व बँकेकडून व्याजदरात कसलाही बदल नाही. रेपो रेट 6.25 टक्क्यांवर कायम
-----------------------------------------------
सांगली: मिरजेत भरदिवसा मुख्य बाजारपेठेतून 30 लाखांची चोरी,एटीएममध्ये पैसे भरायला आलेल्या बँकेच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी रोकड लांबवली
-----------------------------------------------
1. मनभेद आणि मतभेदांना एकदा पूर्णविराम द्यावा लागेल, उद्धव ठाकरेंचे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत, तर सरकार स्थिर असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
2. गोपीनाथ मुंडे पाच आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, अजित पवार यांचा 'माझा कट्टा'वर गौप्यस्फोट, पवारांच्या वाढदिवशी सेलिब्रेशन करण्यासाठी मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचा दावा
3. रेल्वे ट्रॅकवर पुन्हा एकदा रुळाचा तुकडा आढळला, मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे पुणे-हावडा एक्स्प्रेसचा अपघात टळला, दिवा-कळंबोली दरम्यानची घटना
4. औरंगाबादच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांवर जातीवाचक शिवीगाळीचा आरोप, कर्मचाऱ्यांकडून अजित पाटलांची तक्रार
5. भोरमध्ये पीएसआय श्रीकांत खोतांना राजकीय गुंडांची बेदम मारहाण, अर्ज मागे घेताना झालेला गोंधळ रोखताना पोलिसांना बडवलं
6. नागपुरातील क्लाऊड सेव्हन बार तोडफोड आणि शुभम महाकाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, आमदार कृष्णा खोपडेंची दोन मुलं आरोपी
7. बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राजाभाऊ मुंडेंसह 16 दोषी, 5 वर्षाची शिक्षा आणि 60 हजाराचा दंड, अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निर्णय
8. तामिळनाडूत एआयएडीएमकेमध्ये फूट, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं, पन्नीरसेल्वम यांचा शशिकलांवर गंभीर आरोप