• औरंगाबाद: मोदींच्या स्वछता मोहिमेला डाग, महापालिकेचा पहिल्या 10मध्ये समावेशासाठी केंद्रीय पथकातील सदस्यांची 5 लाखाची मागणी

  • मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या 6E 248 फ्लाईटच्या इंजिनाला आग, टर्बाइनचं ब्लेड तुटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

  • शिवसेना-भाजपची युतीसंदर्भात आज संध्याकाळी तिसरी बैठक

  • वांद्रे येथील रंगशारदामध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार

  • शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब आणि रविंद्र मिर्लेकर उपस्थित राहणार

  • भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता उपस्थित राहणार


--------------------------------------------------


भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान आज सुटका करणार : एएनआय

--------------------------------------------------

मुंबई काँग्रेसच्या गटबाजीचा वाद आता नारायण राणेंच्या दरबारात, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम नारायण राणेंच्या भेटीला

--------------------------------------------------
मुंबई : उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल, मनोहर जोशी, रामदास कदम यांच्यासह दिग्गज शिवसेना नेते उपस्थित, युतीसंदर्भात चर्चेची शक्यता

--------------------------------------------------

ठाण्यातील आघाडीबाबत नारायण राणेंच्या घरी बैठक, जितेंद्र आव्हाडांसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही हजर

--------------------------------------------------

सोलापूर महापालिकेत आघाडीसाठीची पहिली बैठक, 26 प्रभागांतील 102 जागांसाठी राष्ट्रवादीचा 68-34 तर काँग्रेसचा 77-25 जागांचा प्रस्ताव

-----------------------------------------------------

मनसेच्या उपाध्यक्षा वीणा भागवत शिवसेनेच्या वाटेवर, मनसेतील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश करणार

वीणा भागवत

---------------------------------

युती करायची नसल्याने शिवसेना पक्षप्रमुखांवर भाजप नेत्यांचा हल्ला, शिवसेनेचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांनाच उत्तर देण्याचंही आव्हान

---------------------------------

देशातून आरक्षणाचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनमोहन वैद्यांचं वक्तव्य, उत्तर प्रदेश निवडणुकांआधी नव्या वादाची चिन्ह

---------------------------------

पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करा, बजेटच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जेटलींकडे मागणी, शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्याची सूचना

---------------------------------

शिवसेनेचा संभाव्य उमेदवार सुरेंद्र शेजवळची हत्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराच्या हत्येने नाशिक भयभयीत

---------------------------------

जलिकट्टूच्या अध्यादेशाला काही बदलांसह केंद्राची मंजुरी, राष्ट्रपतींच्या शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा, तामिळनाडू जनता रस्त्यावर

---------------------------------

अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प शपथबद्ध, डोळे दिपवणाऱ्या सोहळ्यात 9 लाख लोकांची उपस्थिती