हेडलाईन्स:


 

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमिपूजन लांबणीवर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, विनायक मेटेंची माहिती

 

नाशिक: इगतपुरीत पाण्याच्या फिल्टर हाऊसमध्ये क्लोरीन टॅंकरमधून गळती, अंदाजे 25 जण जखमी, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

-----------------------------------------

1. कन्हैया कुमारवरुन FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर आढळल्यानं खळबळ, पोलिसांचा तपास सुरु

2. मराठवाड्याच्या सिंचनासाठी 10 हजार कोटी द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी, डिफॉल्टर शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणाचाही निर्णय

3. आयात केलेलं बीफ चालणार असेल, तर बीफ बंदी कशासाठी? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, बीफ बंदी हटवण्यासाठी शेतकरीही आग्रही

4. शिवसेनेनं टँकर माफिया आणि पाणीचोर नगरसेवकांना राजाश्रय देऊ नये, आशिष शेलारांची शेलकी टीका, पुलाच्या कंत्राटावरून पालिका आयुक्तांनाही टोमणे

5. गृहराज्यमंत्री राम शिंदेंच्या ताफ्यातील गाडीला अल्टोची धडक, अपघातात 1 ठार, 7 जखमी, राम शिंदे सुखरुप

6. ऑगस्टा प्रकरणात मोदींची सोनियांशी हातमिळवणी, दिल्लीत केजरीवाल यांचा घणाघात, मोदींनी पदवीचा संशय दूर करण्याचं आव्हान

7. इंदोरमध्ये लॅन्डिंग दरम्यान विमान रन वेवरुन घसरलं, विमानातील प्रवाशी थोडक्यात बचावले, रन वेवर चिखल असल्यानं अपघात

8. पाच लाखांची लाच घेताना वाईचे पोलीस उपअधीक्षक हुंबरे गजाआड, बेबी पाटणकरच्या तक्रारीनंतर कारवाई, ड्रग्ज प्रकरण भोवलं

9. प्रेयसीसाठी सोलापुरात डॉक्टर रश्मी अग्रहार यांची हत्या, वर्षभरानंतर गंगामाई हॉस्पिटलच्या तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल, आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना

10. मदर्स डेच्या निमित्तानं मुंबईत अनोखा रँप वॉक, आघाडीच्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा बेबी बंपसह रँप वॉक