Continues below advertisement

मुंबई : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मंगळवारी मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईतील कामांसंदर्भात प्रेझेंटेशन दिलं. ठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं असा सवाल विचारणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशनमधून उत्तर दिलं. आम्ही केलेल्या कामाचं प्रेझेंटेशन दिलं तसं भाजपच्या नेत्यांनी येऊन काय काम केलं सांगावं असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.

आमच्या काळात बीडीडी चाळ पुनर्विकासाचा प्रकल्प केला, कोस्टल रोडही आमच्याच काळातील... मात्र त्याचं श्रेय भाजपने घेतल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आमच्या काळात , 2022 पर्यंत आम्ही 92,000 कोटींच्या ठेवी उभारल्या. पण गेल्या तीन वर्षात भाजपने त्या साफ केल्या, सगळा पैसा खाल्ला अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Continues below advertisement

Aaditya Thackeray Presentation : आदित्य ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे,

गेल्या वेळी वरळीमध्येच आपण व्होट चोरीवर बोललो होतो. त्यानंतर प्रत्येक शाखेत चांगल काम झालं आणि दुबार मतदार समोर आले. निवडणुक कधी जाहीर होणार याकडे आपण 4 वर्षे वाट पाहत होतो. आता 25 वर्षात आपण जे काम केलं ते आपल्याला घरोघरी घेऊन जायचं आहे.

वरळी डोम देशातील सर्वात मोठं आणि पहिलं कोव्हीड सेंटर होतं. त्यावेळी आपण होर्डिंग्ज लावले नाहीत तर जीव वाचवले. बीकेसीत आपण फिल्ड हॉस्पिटल सुरु केलं. फेसबुक लाईव्ह होतं, कारण लोकांनी प्रश्न उपस्थित केला की कोरोना काळात तुम्ही कोणाला भेटत नाही, मग पत्रकार परिषदेला पत्रकारांना कशाला बोलवता? त्यामुळे फेसबुक लाईव्ह सुरु केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही फेसबुकवरून संवाद सुरू केला.

इतर राज्यांपेक्षा आपल्या ठेवी चांगल्या होत्या. मुंबईचं काम थांबलं नव्हतं. आम्ही मुंबईकरांवर कोणताही टॅक्स लावला नाही. 2022 साली ज्यांनी आपलं सरकार पाडलं आणि अॅनाकोंडाला सोबत घेतलं, त्यांनी मुंबईची तिजोरी साफ केली. त्यांच्या काळात काहीही काम झालं नाही. मुंबईवरील कर्ज आता अडीच लाख कोटी रुपये इतकं आहे.

महापालिकेच्या शाळा सुधारल्या

आपल्या सत्तेच्या काळात मुंबईत शिक्षणाचा नवा अध्याय लिहिला गेला. मुंबईत 1000 हून अधिक शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये 3 लाख विद्यार्थी शिकतात. एकून 2500 डिजिटल क्लासरुम सुरू झाले. उद्धव ठाकरे यांनी शिक्षणात डिजिटलची नवी भाषा आणली. मुंबई महापालिकेत आयसीसी आणि इतर महत्वाचे बोर्ड आणले. भाजप विचारतं की तुम्ही काय केलं, आता त्यांना सांगा आम्ही काय केलं ते. भाजप आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. महापालिकेच्या माध्यमातून मेडिकल सेंटर आणि नर्सिंग होम सुरू केले. त्या माध्यमातून देशभरातील लोकांना आपण आरोग्याच्या सुविधा देतो. बेस्टचे सध्याचे दर किती वाढले आहेत. इंग्लंडमध्ये गेलो असताना मला आपल्या बसेस संदर्भात विचारत होते. पण

सर्वात स्वस्त पाणी मुंबई महानगरपालिका देते. स्वत:ची धरण व्यवस्था असणारी मुंबई ही एकमेव महापालिका आहे. या ठिकाणी आपला महापौर बसेल त्यावेळी समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करणार. सरकार पडलं नसत तर हा प्रकल्प पूर्ण झाला असता.

मुंबईची ब्रँड अम्बेसेडर पेंग्विनला केल पाहिज. त्यांना आपण जिवंत ठेवलंय. त्या माध्यमातून 2023 मध्ये 123 कोटी रुपये महापालिकेला मिळवून दिले आहेत. हजारो हेक्टरवरील मॅग्रुव्हजला आपल्या सरकारच्या काळात संरक्षण दिलं.

पूरमुक्त मुंबईकडे वाटचाल

पावसाळा आला की मिडियाचे कॅमेरे मुंबईकडे जायचे. हिंदमाता आणि मिलन सबवे या ठिकाणी टँक बनवले त्याचा फायदा होतोय. या ठिकाणचे पंप चालू ठेवावे लागतात. मात्र मागच्या वेळी मी पाहिलं की सिस्टम आहे, पण डिझेल नाही म्हणून पंप बंद आहे आणि त्यामुळे पाणी साचले.

एसटीपीसाठी केंद्राचा निधी आला नाही तर आपल्या महानगरपालिकांचा निधी होता. कचऱ्याच्या टेंडरमध्येही घोटाळा आहे आणि तोही लवकरच समोर आणणार आहोत. मुंबई हवामान बदल कृती आराखडा झाला असता तर आज मुंबई प्रदूषण मुक्त झाली असती.

आपल्या कामाचे क्रेडिट भाजपने घेतले

मुंबई महापालिकेत 500 स्क्वेअर फुटांपर्यंत आपण टॅक्स माफ केला . आता 700 स्क्वेअर फुटपर्यंत माफ करण्याची वेळ आली. बीडीडी चाळ पुनर्विकास आपण केलं होतं. 2016 साली फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी घाईत उद्घाटन केलं. मात्र पुढे काहीच झालं नाही. आपण काम सुरु केलं आणि तीन वर्षात काम पूर्ण झालं.

वरळी शिवडी कनेक्टरचे काम आपल्या काळात 48 टक्के पूर्ण केलं. आता अडीच वर्षात फक्त 9 टक्के काम झालं. अटल सेतूचं काम आपल्याच काळात 82 टक्के काम पूर्ण झालं. कोस्टल रोडचं क्रेडिट मुख्यमंत्री यांनी घेतलं. पण 2013 मध्ये कोस्टल रोडची पहिली घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. काल मिंधेने प्रेझेंटेशन दिलं, तेही आपलंच चोरलं. खोटं बोलायचं कसं ते भाजपकडून शिकावं. ही सगळी कामं आम्ही केली, त्याचं केड्रिट घेऊ नका. नोटबंदी, रुपया पडण्याचं क्रेडिट तुम्ही घेतलं नाही, आता आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका.

मी जसं कामाचं प्रेझेंटेशन दिलं आहे तसं भाजपच्या नेत्यांनी येऊन काय केलं ते सांगावं. त्यांनी सर्व विकास कामांच्या परवानग्या रोखून ठेवल्या होत्या.फडणवीस साहेब कुठे दिसतात का? भाजपचं नशीब चांगलं आहे, फक्त फित कापण्याचं काम त्यांनी केलं.

ही बातमी वाचा: