मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकांची (Election) घोषणा करण्यात आली असून देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवेसना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार आहे. तर, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. पुढील आठवडाभरात उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित करायची असल्याने वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यातच, मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची, विविध मेळाव्यांची जबाबदारी आदित्य ठाकरे घेणार आहेत. निवडणुकीत युवा मतदारांना ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवण्यासाठी, त्यांचे प्रश्न त्यांचे विविध मुद्दे प्रचारात मांडण्याचं कामही आदित्य यांच्या रणनीतीत असणार आहे. 

Continues below advertisement

शिवसेनेत फूट पडण्याआधीपासून आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेमध्ये विविध प्रकल्प, महापालिकेत सुरू असलेल्या घडामोडींवर विशेष लक्ष ठेवले आहे. महापालिकेतील विविध भ्रष्टाचाराचे प्रकरण, प्रशासक नेमल्यानंतर महापालिकेतील गोंधळावर वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या नेमक्या प्रश्नांची, त्यांच्या अडचणींची जाण आदित्य ठाकरे यांना असल्याने या प्रचारात कोणत्या मुद्द्यांना हात घालायचा? कोणते विषय प्रचारात मांडायचे? हे आदित्य ठाकरे आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने ठरवताना पाहायला मिळत आहेत. 

तीन ते चार महापालिकेंवर आदित्य ठाकरेंचं लक्ष 

राज्य निवडणूक आयोगाचा कारभार, मतदार यादीतील घोटाळा अनेक मुद्द्यांवर प्रखरपणे आदित्य ठाकरे समोर येऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जात असताना पक्षातील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी दर्शवल्याचे दिसतय. उद्धव ठाकरे राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीत लक्ष घालत असताना आदित्य ठाकरे मुंबईसह तीन ते चार महापालिकांवर लक्ष घालणार असल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईसह नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये सुद्धा आदित्य ठाकरे सहभागी होणार असून येथे सुद्धा मेळावे घेणार असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, शिवसेना पक्ष, नंतर होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या नेतृत्वात सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेत पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला 

हेही वाचा

पुण्यात भाजपाने राष्ट्रवादीविरुद्ध शड्डू ठोकला, आता अजित पवारही मैदानात उतरले, म्हणाले.....