मुंबई : हे गद्दार देशाचा पाकिस्तान करतायत, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) थेट वार केला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे ब्रीदवाक्य मंत्रालयासमोर लावावं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.  आमदार अपात्रतेच्या निर्णयावर बोलताना त्यांनी म्हटलं की, लोकशाही मारून टाकणारा हा निकाल आहे. चोरांना, गद्दारांना कायदेशीर मान्यता देणारा निकाल आहे. ही लढाई आता देशाच्या लोकसाहीची आहे. भाजपप्रणित खोके सरकारला संविधान मान्य नाही. 2024 मध्ये हे सरकार पुन्हा आल्यास भाजपाचे नवे संविधान ते देशावर लादतील, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर घणाघात केला. 


सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं नव्हतं,त्यावर ते बोललेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात हा निकाल दिला आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याला साजेसा हा निकाल आहे. त्यामुळे कदाचित हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान देखील आहे. आता फासावर लटकवले तरी चालेल पण लोकशाही आणि बाबासाहेबांचे संविधान आम्ही मारू देणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. 


त्याला कळतं विषारी कोण आहे आणि कोण नाही - आदित्य ठाकरे


तेजस  वाईल्ड लाईफ फिल्डमध्ये आहे. त्यामुळे त्याला कळतं कोण विषारी आहे आणि कोम विषारी नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी तेजस ठाकरेंवर भाष्य केलं. ज्या अध्यक्षांनी कायदा आणि निकाल दिल्लीवरून लिहून घेतला आहे.राष्ट्रवादीबद्दलही असेच निकाल येणार आहेत, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर देखील आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. 


हा निर्लज्जपणाचा कळस - आदित्य ठाकरे


मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी  दिलेला निर्णय  निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीच्या हत्या करणारा आहे.विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत. 2024 मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली तर, खोक्यांचा राजकारण झालं तर असंच त्यांना वाचवलं जाणार. भाजपाला आपलं संविधान बदलायचंय. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे ते स्पष्ट झालं. नेक वर्षे  राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा  ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित करत राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गद्दारी केली असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. 


हेही वाचा : 


Aaditya Thackeray : हा निर्लज्जपणाचा कळस, आम्ही कायदेशीर लढाई लढणार, राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया