मुंबई : कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली आहे. मुंबईत ही घटना घडली आहे.


 

पोलिसांच्या माहितीनुसार, 21 वर्षीय प्रेमा पुन्नास्वामी देवेंद्र हिने काल दुपारी सायन कोळीवाडा इथल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमाच्या मृत्यूचं समजताच तिचा प्रियकर व्यंकटेश पेरुमलने (वय 25 वर्ष) वसईत धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आयुष्य संपवलं.

 

प्रेमा आणि व्यंकटेश यांचे प्रेमसंबंध होते आणि लग्न करुन संसार थाटण्याची दोघांची इच्छा होती. परंतु त्यांच्या लग्नाला दोघांच्याही पालकांचा विरोधात होता. त्यामुळे या प्रेमीयुगुलाने आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. दरम्यान त्यांच्या आत्महत्येबाबत कळताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे.