ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2017 11:39 PM (IST)
काही व्यक्ती स्फोटकं विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळत्याच पोलिसांनी सापळा रचून दिलीप राणे, नितीन डोंगरे, नितीन कावनकर या तिघांना अटक केली.
NEXT
PREV
ठाणे : ठाण्यातल्या दिवा परिसरात खर्डी जंक्शनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली. इलेक्ट्रिक डिटोनेटर आणि जिलेटीनच्या ट्यूब असा 9 किलो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांच्या टोळीला अटक केली आहे.
काही व्यक्ती स्फोटकं विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळत्याच पोलिसांनी सापळा रचून दिलीप राणे, नितीन डोंगरे, नितीन कावनकर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 31 डिटोनेटर आणि 61 जिलेटीनच्या ट्यूब हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जप्त केलेल्या स्फोटकांची किंमत जवळपास 4 लाखांपर्यंत आहे. ही स्फोटके कशासाठी वापरण्यात येणार होती. अथवा याचा मुख्य सूत्रधार कोण? याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -