मुंबई: मुंबईतील विद्यमान नगरसेवकांसह माजी महापौरांनाही पुन्हा महापालिकेच्या रिंगणात उतरण्याचे वेध लागले आहेत. विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासोबतच एकूण सात माजी महापौर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.

महापौर स्नेहल आंबेकर यांना मात्र शिवसैनिकांकडूनच विरोध होत आहे. त्यामुळे इच्छा असली तरी 'मातोश्री'चा ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत स्नेहल आंबेकरांची उमेदवारी निश्चित होऊ शकणार नाही.

मात्र, इतर सात माजी महापौर मात्र उमेदवारी मिळवण्याचा कसून प्रयत्न करत आहेत.

सात माजी महापौर

  • मिलिंद वैद्य--( महापौरपदाचा कार्यकाळ 1996–1997)

  • विशाखा राऊत--(महापौरपदाचा कार्यकाळ 1997--98)

  • हरेश्वर पाटील--( महापौरपदाचा कार्यकाळ   1999–2002) (भाजप)

  • महादेव देवळे ( महापौर पदाचा कार्यकाळ--2002–2005)

  • दत्ता दळवी-- ( महापौरपदाचा कार्यकाळ 2005–2007)

  • शुभा राऊळ-- (महापौरपदाचा कार्यकाळ 2007-2009) (विद्यमान नगरसेवक)

  • श्रद्धा जाधव--(महापौर पदाचा कार्यकाळ-- 2009 ते 2012) (विद्यमान नगरसेवक)

  • स्नेहल आंबेकर ( महापौर पदाचा कार्यकाळ--2014 ते आतापर्यंत) (विद्यमान महापौर)