मुंबई विमानतळावर 6 किलो सोनं जप्त
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2017 05:11 PM (IST)
मुंबई : मुंबई विमानतळावर जवळपास 1 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानातून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती कस्टम खात्याला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे हे सोनं पकडण्यात आलं. दुबईतून मुंबईला प्रवास करणारी फरीदा जूजर हजूरी नावाची महिला 6 तारखेला दुबईहून मुंबईला तब्बल 6 किलो सोनं घेऊन येत असल्याची माहिती सीमा शुल्क खात्याला मिळाली होती. त्यानुसार तपासणी केली असता या महिलेकडे जवळपास 1 कोटींचं सोनं सापडलं. सोनं जप्त करत महिलेला ताब्यात घेण्यात आलं. वसईत राहणाऱ्या या महिलेकडे सोन्याची चार पाकिटं सापडली. ज्याची किंमत 1,16,18,854 रुपये एवढी आहे. महिलेला ताब्यात घेतलं असून तीनं आपण सोन्याची तस्करी करत असल्याची कबुली दिली आहे. व्हिडीओ :