मुंबई : मुंबईत एका 51 वर्षीय जीएसटी अधीक्षकाने कफ परेडमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या तिसाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. हरेंद्र कपाडिया असं मृत जीएसटी अधीक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, "सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. यानंतर उपस्थित लोकांनी हरेंद्र कपाडिया यांना तातडीने रुग्णालयात नेलं. परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं." त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.


दहा महिन्यांपूर्वी हरेंद्र कपाडिया यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. यानंतर ते सात महिने ऑफिसला गेले नव्हते. तीन महिन्यांपूर्वी ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. यानंतरही ते काहीसे निराश असायचे. आजारणातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी ड्यूटीवर उपस्थित लोकांचा जबाब नोंदवला असून कुटुंबीयांची चौकशी केली आहे.

GST officer commits suicide | जीएसटी अक्षीक्षक हरेंद्र कपाडिया यांची आत्महत्या | मुंबई | ABP Majha