मुंबई विमानतळावर तब्बल 50 किलो सोनं जप्त
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2017 11:36 PM (IST)
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सोन तस्करीची मोठी घटना समोर आली आहे. तब्बल 50 किलो सोनं यावेळी जप्त करण्यात आलं आहे.
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सोन तस्करीची मोठी घटना समोर आली आहे. तब्बल 50 किलो सोनं यावेळी जप्त करण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल 15 कोटींच्या घरात आहे. डीएचएल या प्रसिद्ध कुरिअर कंपनीतर्फे हे 50 किलो सोनं मुंबई विमानतळावर आलं होतं. डीआरआय आणि कस्टम विभागाच्या संयुक्त कारवाईत हे सोनं पकडण्यात आलं आहे. हे सोनं आखाती देशांमधून आल्याचा संशय डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय कुरिअरवरील पत्ताही खोटा असल्याचं समजतं आहे. यासंबंधी अधिक तपास सुरु असून यामागचा नेमका सूत्रधार शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.