नवी मुंबई : अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महेश फळणीकर असे या आरोपीचे नाव आहे. नवी मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणात तपासाचा वेग वाढला आहे.


चौथा आरोपी गजाआड झाल्याने कुरुंदकरच्या अडचणी वाढल्या आहेत. महेश फळणीकर हा अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र असून, तो कुरुंदकरचे सर्व व्यवहार करत असे. त्याला पुण्याच्या कात्रज परिसरातून सोमवारी अटक करण्यात आली.

महेश फळणीकरला अटक झाल्याने अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

डिसेंबरमध्ये अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी तपास गुन्हे शाखेकडे देऊन तपास अधिकारी बदली झाल्यावर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

ड्रायव्हर कुंदन भंडारी याने लाकूड कापायचे कटर मशीन कोल्हापूर येथील आजरा या ठिकाणी असलेल्या कुरुंदकरच्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती दिली. मात्र तिथे कटर मशीन सापडली नाही. यामुळे या कटरचा शोध घेण्यासाठी भंडारी आणि फळणीकर यांची एकत्रित चौकशी करण्याची मागणी पोलिसांनी कोर्टापुढे केली असता, कोर्टाने दोघांना एक मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली.

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी अश्विनीच्या कुटुंबाने केली होती. परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. याचा तपास गुन्हे शाखेकडे गेल्यावर इतर आरोपी समोर आले असल्याचा दावा अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

बेपत्ता API बिद्रे प्रकरण : अभय कुरुंदकरच्या खासगी ड्रायव्हरला अटक

बेपत्ता API बिद्रे प्रकरण: वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर निलंबित

बेपत्ता API बिद्रे प्रकरण: कळंबोली, जळगाव आणि सांगलीतून धरपकड

घराला नवा रंग, कुरुंदकरांनी बिद्रेंचा घातपात केल्याचा संशय

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत

बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण