मुंबई : आपल्या विविध मागण्यासाठी आज राज्यातील 4 हजार 500 खाजगी विनाअनुदानित इंग्रजी शाळा बंद राहणार आहेत. या बंदला मुंबई स्कूल बस असोशिएननेसुद्धा पाठिंबा दिला आहे. राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी स्कूल सेक्युरिटी अॅक्ट लागू करावा या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी, राज्यातील सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी स्कुल सेक्युरिटी अॅक्ट लागू करावा, अशा मागण्यांसाठी इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने राज्यभरातील इंग्रजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा बंदमध्ये राज्यातील 29 जिल्ह्यातील साडे चार हजार शाळा सहभागी होणार आहेत. ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा आहेत अशा शाळांना यामध्ये वगळण्यात आल्याचा ईसा संघटनेने सांगितले आहे.
1 नोव्हेंबर 2018 चा शासन निर्णय रद्द करावा, 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयात सुधारणा करावी, मोफत गणवेश, पुस्तके, पिशवी आणि अन्य साहित्य उपलब्ध करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. याशिवाय स्वयं अर्थसाहाय्यित शाळांचा दर्जा वाढ होण्यासाठी तातडीने ऑनलाईन प्रक्रिया सुरू करावी, अशा काही महत्वाच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत. या शाळा बंदला मुंबई स्कुल बस असोशिएनने सुद्धा पाठिंबा दिला असून जवळपास मुंबईतील 140 इंग्रजी खाजगी विनाअनुदानित शाळाच्या बस आज बंद असणार आहेत.
विविध मागण्यांसाठी राज्यातील साडेचार हजार इंग्रजी शाळा आज बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2019 07:59 AM (IST)
या शाळा बंदमध्ये राज्यातील 29 जिल्ह्यातील साडे चार हजार शाळा सहभागी होणार आहेत. ज्या इंग्रजी शाळांमध्ये प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा आहेत अशा शाळांना यामध्ये वगळण्यात आल्याचा ईसा संघटनेने सांगितले आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -