कचरा टाकण्याच्या वादातून डोंबिवलीत महिलेची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2017 03:45 PM (IST)
डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून 45 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
डोंबिवली : डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून एका महिलेची हत्या झाल्याची खबळबळजनक घटना समोर आली आहे. सुनंदा लोकरे (वय 45 वर्ष) असं मृत महिलेचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड भागात ही आज (बुधवार) सकाळी १० ते १०.३०च्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी रविंद्र मसूरकर (वय 35 वर्ष) याला अटक करण्यात आली आहे. सुनंदा लोकरे या अनेकदा रविंद्रच्या घराजवळ बऱ्याचदा कचरा टाकत. यावरुन त्यांच्यात अनेकदा वादही झाले. दरम्यान, आज सकाळी देखील सुनंदा लोकरे आणि रविंद्रमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी रविंद्रने लोखंडी रॉडनं केलेल्या मारहाणीत सुनंदा यांचा मृत्यू झाला.