Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा (Mumbai Corona Update) आलेख घसरत आहे. रविवारी नव्या 35 रुग्णांची आज नोंद झाली आहे. काल 32 बाधित आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार आज नवे 35 कोरोनाबाधित आढळले असून 43 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 282 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 35 रुग्णांपैकी पाच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 151 बेड्सपैकी केवळ 14 बेड सध्या वापरात आहेत.
राज्यात आज 117 रुग्णांची नोंद
राज्यात सध्या 921 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 117 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 131 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 94, 72, 239 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 117 रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू
Corona in China : चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच, शांघायमध्ये एका दिवसात 8226 रुग्णांची नोंद, जगाची चिंता वाढली
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 रुग्ण, 81 जणांचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha