Mumbai Coronavirus Updates: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यात मुंबई महानगरपालिकेला (BMC) मोठं यश आलंय. कोरोनाच्या महामारीच्या काळात मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरं जावा लागलं होतं. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळतंय. यातच मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीय. मुंबईत आज तिनशेहून कमी रुग्णांची नोंद झालीय. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहचलाय. तर, आज केवळ एकाच व्यक्तीने कोरोनामुळे जीव गमवलाय.
मुंबईतील आजची आकडेवारी-
मुंबईत गेल्या 24 तासात 279 नवे रुग्ण आढळून आले. तर, केवळ एकाच मृत्युची नोंद झाली. याचबरोबर आज 313 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहचलाय. मुंबईतील कोरोना दुप्पटीचा दर 2 हजार 244 दिवासांवर गेलाय. मुंबईत सध्या 2 हजार 780 सक्रीय आहेत. आजची आकडेवारी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी आहे. एवढंच नव्हेतर, मुंबई कोरोना मुक्तच्या दिशेनं वाटचाल करू लागलाय, असं म्हणणं वावग ठरणार नाही.
कोरोनामुळे जन्मदरात घट-
शहरात कोरोना नियंत्रणात असूनही परिस्थिती अनुकूल होत आहे. मात्र, असे असतानाही कोरोनामुळे बालकांचा जन्मदर घटला आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये जन्मदरात 20 टक्के घट झाली आहे. तोच क्रम यंदाही पाहायला मिळतोय. ऑक्टोबर 2021 पर्यंत जन्मलेल्या मुलांच्या संख्येची 2020 मध्ये जन्मलेल्या मुलांच्या संख्येशी तुलना केल्यास, कमी मुलं जन्माला आल्याचे समजत आहे. मागील 10 महिन्यात 82,231 बालकांचा जन्म झालाय. दर महिन्याला सरासरी 8 हजार मुले जन्माला येत असल्याचा अंदाज आहे. तर 2020 मध्ये दर महिन्याला 10 हजार मुले जन्माला येत होती. बीएमसी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये दर महिन्याला सरासरी 2 हजारांहून कमी बालकांचा जन्म होत आहे.
हे देखील वाचा-
Vaccination : कोरोना: ठाणे महापालिकेची 100 टक्के लसीकरणासाठी व्यापक मोहीम
इंधन आणि गॅस दरवाढीचा खवय्यांना फटका, हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढणार