मुंबई : मुंबई शहरात 26 हजार 934 खड्डे पडल्याचा दावा रिपाइंचे सरचिटणीस नवीन लादे यांनी केला आहे. या खड्ड्यांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
खड्डेयुक्त शहर किंवा रस्त्यावरील खड्ड्यांच्या विक्रमाची नोंद नसल्याने त्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे. नवीन लादे यांच्या टीमने शहरातील नागरिकांकडून खड्ड्यांचे फोटो मागवले. त्यानंतर ते सेंट्रल डेटाबेसवर अपलोड केले. एकच खड्डा पुन्हा पुन्हा नोंदीत येऊ नये यासाठी जिओ टॅगिंग करण्यात आलं.
हा सगळा मजकूर 'मुंबईपॉटहोल्सडॉटकॉम'वर उपलब्ध आहे. खड्डेमोजणीचा प्रकार तब्बल 38 दिवस सुरु होता. विशेष म्हणजे यासाठी तब्बल चार लाख रुपये खर्च झाला.
आता खड्डा दाखवा आणि हजार रुपये मिळवा, किंवा मुंबईत खड्डेच नाहीत, असा दावा करणाऱ्यांची पोलखोल करण्यासाठी हे पुरेसं आहे
मुंबईतील 26,934 खड्ड्यांची गिनीज बुकात नोंद करणार : रिपाइं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2018 08:19 PM (IST)
मुंबईतील खड्ड्यांची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यासाठी रिपाइं प्रयत्नशील आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -