महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी 26 सिंचन प्रकल्प, नितीन गडकरींची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2017 07:14 PM (IST)
महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी महाराष्ट्रातील 26 सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी महाराष्ट्रातील 26 सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (शुक्रवार) केंद्रीय रस्ते विकास आणि नदीजोड प्रकल्प मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. राज्यातले सगळे जिल्हाधिकारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे यातील सगळ्या अडचणीही तातडीनं सोडवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 26 सिंचन प्रकल्प पूर्ण झाले तर 5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसंच दमणगंगा नदीजोड प्रकल्पामुळे राज्याला मोठा फायदा होईल असंही गडकरी आणि फडणवीसांनी सांगितलं. यावेळी राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामंही वेगानं करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं गडकरींनी सांगितलं.