मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर परिसरात विजेचा शॉक लागून एका 23 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद नसीम अली असं मृत तरुणाचं नाव असून तो शिवडी परिसरात राहत होता.
सिद्धिविनायक मंदिराजवळील घाणेकर मार्गावर विजेच्या वायरिंगचं काम सुरु होतं. हा तरुण कॉन्ट्रॅक्टरसोबत काम करण्यासाठी तिथे गेला होता. पण मंगळवारी रात्री उशिरा एका लोखंडी पाईपमध्ये वीज वाहत असताना, या पाईपच्या संपर्कात आल्याने मोहम्मद अलीला शॉक लागला .
मोहम्मदला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दादर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.
दरम्यान, अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी रात्रीपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिद्धिविनायक मंदिराजवळ विजेच्या शॉकने 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2018 04:14 PM (IST)
दादर पोलिसांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी मृत मोहम्मद अलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -