- ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 'संस्कृती'च्या प्रो दहीहंडीमध्ये जय जवान मंडळानं अवघ्या 1 मिनिट 3 सेंकदात नऊ थरांची सलामी देऊन एक नवा विक्रम रचला आहे. दरवर्षी जय जवान मंडळ नऊ थर लावतं यंदाही त्यांनी हा प्रताप पुन्हा एकदा करु दाखवला आहे. जय जवान मंडळ हे जोगेश्वरीचं आहे.
- दहीहंडीत आजवर माजगाव ताडवाडी आणि जय जवान या मंडळांचा दबदबा कायम होता. पण यंदा बोरीवलीच्या शिवसाई मंडळानं ठाण्यातील नौपाडामध्ये मनसेच्या दहीहंडीत नऊ थर रचून विक्रमाशी बरोबरी केली आहे. यावेळी त्यांनी तब्बल 11 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे.
- बोरीवलीच्या शिवसाई मंडळाची ठाण्यातील नौपाड्याच्या दहीहंडीत 9 थरांची सलामी
- मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना कोकणातले पाहुणेही ठाण्यात दहीहंडी बघण्यासाठी दाखल झाले आहेत. यात त्यांनी खास मालवणी भाषेत गोविंदांच्या सुरक्षेसाठी गाऱ्हाणं घेतलं आहे.
VIDEO : अभिनेता सुबोध भावेसोबत दहीहंडीचं सेलिब्रेशन
- ठाण्यातील मनसेच्या दहीहंडीत जय जवान मंडळाचा नऊ थर रचण्याचा पहिला प्रयत्न फसला
- ठाण्यातील नौपाडामध्ये महिला पथकानं दिली सहा थरांची सलामी
- दादरमध्ये आठ थरांची सलामी
दादर, घाटकोपर, जोगेश्वरी, ठाणे अशा अनेक भागात दहीहंडीची तयारी पूर्ण झाली आहे. ठाण्यात 9 थर लावणाऱ्या गोविदांसाठी 11 लाख तर घाटकोपरमध्ये 25 लाखांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. हे पारितोषिक मिळवण्यासोबतच गोविंदांच्या सुरक्षेसाठीही तयारी केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
आयोजकांकडूनही हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.