मुंबई : शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. कारण शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील, ते भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.

काय म्हणाले रवी राणा?

रवी राणा म्हणाले, “शिवसेनेने दसरा मेळाव्यात पाठिंबा काढण्याची घोषणा केली, तरी काही फरक पडणार नाही. कारण आम्ही अपक्ष 6 आमदार देवेंद्र फडणवीसांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. इतकंच नाही तर शिवसेनेने पाठिंबा काढला तर त्यांचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील. त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार अजिबात अल्पमतात येणार नाही”

शरद पवारही पाठिंबा देतील

दुसरीकडे रवी राणा यांनी शरद पवारही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील, असाही दावा केला.

रवी राणा म्हणाले, ”शरद पवार यांचा नागरी सत्कार प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. जिकडे- जिकडे सत्कार होईल तिकडे तिकडे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं काम सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवारही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

सहा अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात?

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

हे आहेत नवनिर्वाचित 288 आमदार