ठाणे : भिवंडीत रहिवासी इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत भिवंडीतील उद्योजक निजामुद्दीन अन्सारी यांची आहे.


भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरात आज सकाळी ही घटना घडली. इमारतीमध्ये असलेल्या एसीमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली.



8 ते 10 जणांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. या इमारतीच्या शेजारी दोन पेट्रोलपंप आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही पेट्रोल पंप बंद करण्यात आली आहेत.

दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.