मुंबई : ‘जेव्हा नारायण राणे सांगतील तेव्हा मी निर्णय घेईन, राजकारणात टायमिंग महत्वाचा असतो, जेव्हा ते आदेश देतील तेव्हा त्या निर्णयाची मी अंमलबजावणी करेन.’ अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी आपली भूमिक स्पष्ट केली.
नारायण राणे यांनी काल (गुरुवार) आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिली. मात्र, यावेळी नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही. तसेच त्या पत्रकार परिषदेलाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्ष कारवाईच्या भीतीनं नितेश राणे हे तिथं हजर नव्हते अशी चर्चा रंगली होती. पण या चर्चेला खुद्द नितेश राणेंनीच उत्तर दिलं आहे.
‘पक्ष कारवाईची भीती मला नाही कारण माझे बॉस नारायण राणे आहेत. त्यामुळे मला भीती नाही. नारायण राणेंच्या सर्व निर्णयात मी सहभागी आहे. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन देखील मी करतो आहे. समर्थ विकास पॅनल निवडून त्यांना दिवाळी गिफ्ट देईन.’ असं नितेश राणे म्हणाले.
यावेळी बोलताना नितेश राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. ‘अशोक चव्हाण यांनी आता तरी जागं व्हावं, आता तरी पक्षाचा विचार करावा नाहीतर पक्षात काही बदल होणार नाही.’ अशी टीका नितेश राणेंनी केली.
दरम्यान, यावेळी नितेश राणेंनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. ‘मराठा समाजाची साथ सोडणार नाही, कुठेही असलो तरी समाजासाठी काम करणार.’ असंही नितेश राणे म्हणाले.
माझे बॉस नारायण राणे, त्यामुळे मला भीती नाही: नितेश राणे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2017 01:00 PM (IST)
‘पक्ष कारवाईची भीती मला नाही कारण माझे बॉस नारायण राणे आहेत. त्यामुळे मला भीती नाही. नारायण राणेंच्या सर्व निर्णयात मी सहभागी आहे. त्यांच्या दौऱ्याचं नियोजन देखील मी करतो आहे. समर्थ विकास पॅनल निवडून त्यांना दिवाळी गिफ्ट देईन.’ असं नितेश राणे म्हणाले.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -