मुंबई : दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाल्यानंतर, खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. हे दोन नेते स्थानिक नगरसेवक असल्याचं कळतं.


ह्या नगरसेवकांची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, तसंच त्यांची नावं काय आहेत, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. आरोपींनी चौकशीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नावं घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

याशिवाय ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनीही खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं असल्याची शंका व्यक्त केली होती.

दरम्यान, खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने सोमवारी रात्री इक्बाल कासकरसह तिघांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी नागपाड्यातील हसीना पारकरच्या घरातून कासकरला अटक केली.

ठाणे कोर्टाने इक्बाल कासकरला आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

संबंधित बातम्या

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर अटकेत

अटकेवेळी इक्बाल केबीसी पाहत, बिर्याणी खात होता: पोलीस

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचं धडाक्यात कमबॅक

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल