मुंबई : मुंबईतील राजभवनाजवळ समुद्रात बोट बुडाली. या बोटीत 2 मच्छिमार असल्याचंही कळतं. पोलिसाचं नौदलाच्या मदतीने शोध कार्य सुरु आहे.


समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी बनतोय, तिथे काम सुरु होते. त्या ठिकाणीच सकाळी बोट बुडाली. बोटीवर दोन मच्छिमार असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

मच्छिमार आणि बोटीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ते सध्या बेपत्ता असून दोघांचाही शोध सुरु आहे.