धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत राज्यातील महिला अत्याचारा पाढाच वाचला. जिथे आरोग्य मंत्र्याचा पीए डॉक्टर महिलेचा विनयभंग करतो, तिथे या सरकारकडून सुरक्षेची हमी काय बाळगावी असं मुंडे म्हणाले.
वाघाच्या जबड्यात हात घालू म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी, आरोपीचा हात तरी पकडायचा होता, असं म्हणत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक न राहिल्याचं मुंडे म्हणाले.
सध्या महिला शेतावर जायला घाबरत आहेत. नगरमध्ये दहशतीचं वातावरण आहे. आताच विचार करा, अन्यथा 15 वर्षांनी आलेली सत्ता जायला वेळ लागणार नाही, असा घणाघात मुंडेंनी केला.
अजित पवारांचा हल्लाबोल
कोपर्डीतील बलात्कार अत्यंत पाशवी कृत्य आहे. याप्रकरणी तातडीने तपास करुन, तपासात कुठेही दोष राहणार नाहीत याची काळजी घ्या. जेणेकरुन न्यायालय आरोपींना मरेपर्यंत फाशीच सुनावेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
चांद्यापासून - बांद्यापर्यंत महिलांवर अत्याचार सुरु आहेत, हे अत्याचार कसे रोखता येतील याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं. कोपर्डीत घटना घडली त्यावेळी आरोपी दारु पित बसले होते, तिथे अनधिकृत दारुचा अड्डा चालूच कसा होता? अशी परिस्थितीच नसती, तर कोपर्डी बलात्कार झालाच नसता, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या
कोपर्डी बलात्कार : आरोपींना फाशीच होईल असा तपास करा : अजित पवार
कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
कोपर्डी प्रकरण: राम शिंदेंसोबत फोटोत असलेली ‘ती’ व्यक्ती आरोपी नाही
आरोप करणाऱ्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी मागावी: मुख्यमंत्री
राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा