मुंबई : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यात कुख्यात गँगस्टर अबू सालेमला नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.


1993 मुंबई साखळी स्फोटाप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने मुस्तफा डोसा, कुख्यात गँगस्टर अबू सालेम, करिमुल्ला खान, फिरोज अब्दुल रशीद खान, रियाझ सिद्दीकी, ताहिर मर्चंट या सहा आरोपींना दोषी ठरवलं होतं.

यातील एक दोषी मुस्तफा डोसा याला सीबीआयने फाशीची मागणी केली होती. पण शिक्षेच्या युक्तीवादादरम्यानच त्याचा मृत्यू झाला होता. तर यातला सातवा आरोपी अब्दुल कय्यूम याची कोर्टाने निर्दोष म्हणून मुक्तता केली होती.

त्यामुळे आज पाच दोषींना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.पोर्तुगालशी भारताने केलेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यामुळे सालेमला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली आहे.

तर ताहिर मर्चंट, फिरोज खान, करीमुल्ला खान यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. तसंच रियाज सिद्दीकाला जन्मठेपेची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!

1993 बॉम्बस्फोटातील दोषींना लवकरच शिक्षा सुनावणार


मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू


1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत आजपासून युक्तीवाद


1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद


12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?


मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष


संबंधित फोटो फीचर


1993 मुंबई साखळी स्फोट : कोणावर काय आरोप?