मुंबईतील जुहूत सिलेंडरचा स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2017 07:25 AM (IST)
जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले सर्वजण कामगार आहेत.
मुंबई : मुंबईतील जुहू परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू, तर 12 जण जखमी झाले आहेत. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जुहू परिसरातील रात्री दहाच्या सुमारास प्रार्थना इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. तेथे असलेल्या लाकडी आणि भंगाराच्या साहित्यामुळे आग भडकली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग विझवण्यात यश आले आहे. जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले सर्वजण कामगार आहेत. दरम्यान, जखमी कामगारांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.