दुबईहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून प्रत्येक एक तोळे वजनाची 18 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत. या बिस्किटांची किंमत जवळपास 54 लाख 67 हजार रुपये इतकी आहे. मात्र या घटनेत अद्याप कुणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही.
दुसऱ्या कारवाईत बँकाकहून आलेल्या प्रवाशाकडून सोन्याची चेन, ब्रेसलेट असे 8.75 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी विमलेश पांचाल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुंबई विमानतळावर 2 कारवायांमध्ये 40 कोटींचं सोनं जप्त
शुक्रवारीच मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या दोन कारवाईत 40 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी एकूण चार आरोपींना कस्टम विभागानं ताब्यात घेतलं.