मुंबई : 155 वर्ष जुन्या ऐतिहासिक ‘फ्लोरा फाऊंटन’ची अवस्था पुन्हा एकदा जैसे थे झाली आहे. अवस्था अवघ्या चार दिवसात नवी झळाळी मिळालेल्या फ्लोरा फाऊंटन बंद पडलं आहे.

एकेकाळी देश-विदेशी पर्यटकांचं आकर्षण स्थान बनलेल्या मुंबईतील ‘फ्लोरा फाऊंटन’ या ऐतिहासिक वास्तूला मागील गुरुवारी पुन्हा झळाळी प्राप्त झाली. कारंज्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हे कारंजे बंद करण्यात आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी याबाबच माहिती दिली.

नूतनीकरणानंतर फ्लोरा फाऊंटनचं लोकार्पण युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडलं. पालिकेने या वास्तूच्या नूतनीकरनासाठी तब्बल 3 कोटी खर्च केले आहे.

2007 मध्येही कारंजी बंद पडली आणि या वास्तूची दुरवस्था होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेत पालिकेने या वास्तूची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला. मात्र आता पुन्हा कारंजी बंद पडल्याने पालिकेवर नामुष्की ओढवली आहे.

संबंधित बातम्या

PHOTO : 155 वर्ष जुन्या ऐतिहासिक ‘फ्लोरा फाऊंटन’ला नवी झळाळी