मुंबई : कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील सह्याद्री आतिथीगृहाच्या गेटवर पोलिसांशी बाचाबाची केल्याचा प्रकार समोर आला आहे. वैभव नाईक यांना अतिथीगृहात जाण्यास पोलिसांनी अडवल्याने वैभव नाईक यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.
सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची बैठक सुरु असल्यानं पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना आत जाण्यास मज्जाव केला. मात्र शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांना आत सोडल्यानं नाईकांना संताप अनावर झाला आणि त्यानी पोलिसांशी बाचाबाची केली.
विनायक मेटे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असल्यानं त्यांची गाडी आत सोडण्यात आली असल्याचं पोलिसांनी नाईकांना सांगितलं. मात्र तरी नाईक शांत झाले नाही आणि त्यांनी पोलिसांना न जुमानता सह्याद्री अतिगृहात प्रवेश केला. घडलेल्या प्रकारामुळे गेटवर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेना आमदार वैभव नाईक यांची पोलिसांशी बाचाबाची
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jan 2019 05:47 PM (IST)
सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची बैठक सुरु असल्यानं पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना आत जाण्यास मज्जाव केला. मात्र शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांना आत सोडल्यानं नाईकांना संताप अनावर झाला आणि त्यानी पोलिसांशी बाचाबाची केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -