ऊमुंबई: एसटी महामंडळात येत्या काही महिन्यांत मोठी भरती केली जाण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळात तब्बल 15 हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्या जागा भरण्यासाठी एसटी भरती प्रक्रिया सुरु करण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशी एसटी महामंडळाची सध्या बोलणी सुरु आहे.
दोन वर्षापूर्वी एसटी महामंडळात मोठी भरती झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत भरती करण्यात आली नव्हती. १५ हजार पदं ही सरळ सेवेतील परीक्षा घेऊन भरावी लागणार आहे.
या भरतीत चालक आणि वाहक पदक मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. तसेच कारगीर आणि साहाय्यक कारगीर पदे देखील रिक्त आहेत. दरम्यान, ही भरती प्रकिया अद्याप विचारधीन असून याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, त्यामुळे लवकरच तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते.