BREAKING: कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांना सदनिका जाहीर, गोवंडी, गौतम नगर इथे पुनर्वसन

---------------------

BREAKING: उरी हल्ल्याबाबत महत्वपूर्ण बैठक, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह उपस्थित



 


जम्मू-काश्मीर : उरीमध्ये 8 दहशतवाद्यांचा खात्मा, आणखी 7 दहशतवादी लपल्याची शक्यता, भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच

---------------------

मुंबईत पावसाचा जोर वाढला, मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिरानं

---------------------

स्मार्ट सिटीची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच शहरं, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांचा समावेश

---------------------

धुळे: पाण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला शेतकऱ्यांचा घेराव,जिल्हाधिकाऱ्यांचं वाहन अडवून कार्यालयावर दगडफेक

---------------------

नवी दिल्ली : उरी हल्ल्याबाबत एनआयएकडून अज्ञातांविरोधात केस दाखल, मृत अतिरेक्यांचे डीएनए नमुने आणि सैन्याकडून पुरावे गोळा करुन तपास करणार

---------------------

टिटवाळा, कसाऱ्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक उशिराने, खडवलीजवळ रेल्वे रुळाला गेलेले तडे दुरुस्त, वाहतूक विस्कळीत

---------------------

पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून मोखाड्यात जमावबंदी, आंदोलन होऊ नये म्हणून जमावबंदी लागू

---------------------

खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला, मराठा मोर्चा आयोजनासंदर्भात माहिती देणार


---------------------
नाशिक: दिराकडून वहिनीची कोयत्याने वार करुन हत्या, अंबडच्या दत्तनगरमधील घटना, आरोपीला अटक

---------------------

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सकाळी 10.30 वाजता एनएसए, अनेक गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांसोबत बैठक

---------------------

1 . शहीद संदीप ठोक यांना अखेरचा सलाम, नाशिकच्या खडांगळीत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, महाराष्ट्राच्या इतर तीन शहीद सुपुत्रांवर आज अंत्यसंस्कार

---------------------

2 . वडील शहीद झाल्याचं समजल्यानंतरही मुली परीक्षेला पोहोचल्या, बिहारच्या गयातील संदीप कुमार यांच्या लेकींना देशवासीयांचा सलाम

---------------------

3 . उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना वेग, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतींची भेट, पाकवरील कारवाईसंदर्भात सर्वपक्षीय बैठक होणार

---------------------

4 . पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ, उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करानं ठणकावलं, देशभरातूनही पाकिस्तानविरोधात संतापाची लाट

---------------------

5 . भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचं अमेरिकेला साकडं, काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी

---------------------

6 . एकाच दिवशी जालना, अकोला आणि लातुरात मराठा समाज रस्त्यावर, आरक्षण आणि अॅट्रॉसिटीत बदल करण्याची मागणी

---------------------

7 . जीएसटीची अधिसूचना 16 सप्टेंबरपासून काढल्यानं एक्साईज आणि जकात वसुली बेकायदा, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, करदात्यांना पैसे परत करण्याची मागणी

---------------------

8 . मंत्रिपदावर असताना खडसेंचा भोसरी जमिनीचा व्यवहार चुकीचा, मुंबई हायकोर्टाचे ताशेरे, महसूलला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

---------------------

9 . मुस्लिम इसमाला घर नाकारणाऱ्या सोसायटीच्या 8 सदस्यांना अटक, वसईच्या हॅप्पी जीवन सोसायटीच्या सदस्यांना कायद्याचा धडा

---------------------

10 . मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढचे 4 दिवस चांगल्या पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज

---------------------

एबीपी माझा वेब टीम