मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, अभिनेता अर्जून कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांनी जिथे अभिनयाचे धडे गिरवले त्या संस्थेत एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मुंबईच्या जॉन बेरी या प्रसिद्ध अॅक्टिंग स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीनं आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संस्थेतील अतुल नावाच्या शिक्षकानं अभिनयाच्या नावाखाली नको ते प्रकार करण्यास सांगितल्याचा आरोप या विद्यार्थिनीनं केला आहे. त्यानं मारहाण केल्याचा आरोपही तरुणीन तक्रारीत केला आहे.
संस्था चालक जॉन बेरी यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून पोलीस तपासात सत्य बाहेर येईलच असा विश्वास व्यक्त केला.