मुंबई : बोचऱ्या थंडीत मुंबईनगरी 14 व्या मॅरेथॉनसाठी एकत्रितपणे धावली. मुख्य मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या शर्यती मॅरेथॉनमध्ये पार पडल्या आहेत.


हाफ मॅरेथॉन आणि हौशी धावपटूंच्या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील धावपटूंनी सहभाग घेतला. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये जी लक्ष्मण यांनी बाजी मारली, तर सचिन पाटील यांनी दुसऱ्या क्रमांक पटकावला. दीपक कुंभार हे तिसरे आले.

दिव्यांगांचाही नेहमीप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेत मोठा सहभाग आहे. सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दिव्यांगांच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. सीएसटीपासून सुरु झालेली ही मॅरेथॉन मेट्रो सिनेमाजवळ संपली. या मॅरेथॉनसाठी 2.4 किलोमीटर इतकं अंतर ठेवण्यात आलं.

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महादेव जानकर, शायना एनसी उपस्थित होते. यंदाही या शर्यतीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

42 किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनला सीएसटीपासून सुरुवात झाली. वांद्र्यापासून पुन्हा सीएसटीला या मॅरेथॉनचा शेवट झाला.

विजेत्यांची यादी

हाफ मॅरेथॉन (पुरुष)

प्रथम - जी लक्ष्मण
द्वितीय - सचिन पाटील
तृतीय- दीपक कुंभार

हाफ मॅरेथॉन (महिला)

प्रथम -  मोनिका आथरे
द्वितीय - मीनाक्षी पाटील ( महाराष्ट्र पोलीस )
तृतीय- आराधना सिंग ( सीआयएसएफ )

फुल मॅरेथॉन भारतीय (पुरुष)

प्रथम - खेता राम
द्वितीय - बहादूर सिंग धोनी
तृतीय- टी.एच. संजीत लुवांग

फुल मॅरेथॉन भारतीय (महिला)

प्रथम - ज्योती गवते, परभणी

फुल मॅरेथॉन परदेशी (पुरुष) -

प्रथम - अल्फॉन्स सिंबू, टांझानिया
द्वितीय - होशुआ किपकोरिर, केनिया
तृतीय- इल्यू बर्गेटनी

फुल मॅरेथॉन परदेशी (महिला) -

प्रथम - बोर्नेस कितूर, केनिया
द्वितीय - तिगी गिरमा, इथिओपिया