यवतमाळमध्ये लग्न समारंभात सफाई कर्मचाऱ्याकडून मुलीचा विनयभंग
दोन महिन्यांपासून त्याचा हा घाणेरडा प्रकार सुरू होता. 15 तारखेला शाळेला सुट्टी असूनही एका विद्यार्थीनीला त्याने कंम्प्युटर शिकविण्याच्या बहाण्याने शाळेत बोलवले होते. यावेळी त्याच्या संशयित हालचाली बघून शाळेतील सिक्युरिटीच्या ही बाब लक्षात आल्यावर शाळा मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यात आली. याबाबतीत चौकशी केली असता 14 विद्यार्थींनींचा विनयभंग केला असल्याचे मुलींकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पालिकेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर नवी मुंबई पोलीसांनी आरोपी शिक्षक लोचन परूळेकरला अटक केली आहे.
सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोचन हा गत दोन तीन महिन्यापासून विनयभंग करीत असून विद्यार्थिनींना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त प्रशिक्षणाच्या नावाखाली अनेकदा त्याने बोलावले. काही दिवसापूर्वी शाळेची सहल गेल्याने शाळा बंद होती. मात्र सहलीस अनेक विद्यार्थी गेले नव्हते. ज्या विद्यार्थिनी गेल्या नाहीत अशांना त्याही दिवशी लोचनने शाळेत प्रशिक्षणाच्या नावाखाली बोलावून घेतले. ही बाब शाळेच्या शिपायाला खटकली. त्यामुळे याबाबत त्याने शाळेतील काही शिक्षकांना कल्पना दिली. यात काही गडबड असू शकते अशी शंका आल्याने शाळेतील महिला शिक्षकांनी विद्यार्थिनींना विश्वासात घेत विचारपूस केली असता विद्यार्थिनी बोलत्या झाल्या आणि सदर प्रकार उघडकीस आला.