लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला
बारावीची प्रश्नपत्रिका नवी मुंबईत वेळेपूर्वीच व्हॉट्सअॅपवरबारावीचा सलग तिसरा पेपर लीक, गणिताचा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 06 Mar 2017 02:21 PM (IST)
नवी मुंबई: परिक्षेपूर्वी बारावीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्याच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीए. आज पार पडलेला बारावीचा गणिताचा पेपरही परिक्षेच्या काही मिनिटांपूर्वी व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी अद्याप बोर्डाची अधिकृत प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. यापूर्वी बारावीचा मराठीचा, वाणिज्य शाखेचा एसपीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. मात्र कोणीतरी मोबाईलमधील वेळ बदलून परीक्षा सुरु झाल्यानंतर हे पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याचं बोर्डाचं म्हणणं होतं. दरम्यान, मराठी पेपर फुटी प्रकरणी वाशी पोलिसांनी मालाडवरून दोघांना तर कांदिवलीतून दोघांना अटक केली आहे. यांच्याकडे पेपर कसा आला याबाबत वाशी पोलीस तपास करीत आहेत. याचदरम्यान आज गणिताचा पेपर लीक झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित बातम्या: बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरफुटी प्रकरणी चौघे अटकेत