19 वर्षीय मोहम्मद शेख या बारावी (एक्सटर्नल)च्या विद्यार्थ्याला आणि 26 वर्षीय सुरेश विमलचंद झा नामक खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
रविवारी मालाडमधून अझरुद्दीन शेख आणि राहुल भास्कर यांना अटक केली होती. अझरुद्दीन शेख हा एसवायचा विद्यार्थी आहे तर राहुल भास्कर हा टीवायचा विद्यार्थी आहे.
चौघांनाही कोर्टात हजर करुन पोलिस कोठडी सुनावली जाणार आहे. मात्र आरोपींकडे प्रश्नपत्रिका कशी आली, याबाबत वाशी पोलिस तपास करत आहेत.
बारावीची प्रश्नपत्रिका नवी मुंबईत वेळेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर
बारावीच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटण्याचं सत्र सुरुच आहे. वाणिज्य शाखेच्या चिटणिसाची कार्यपद्धती (सेक्रेटरिअल प्रॅक्टिस) या विषयाची प्रश्नपत्रिका शनिवारी परीक्षेच्या वेळेपूर्वी जवळपास पंधरा मिनिटे व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाली होती.
यापूर्वी भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकाही वेळेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर उपलब्ध झाल्याची चर्चा आहे. 28 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु झाली.
लातुरात बारावीचा पेपर पुन्हा फुटला
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव येथील महादेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचा राज्यशात्राचा पेपर व्हाट्सअॅप फिरत होता.