झोपाळ्याचा फास आवळला, 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2018 10:53 PM (IST)
आईच्या साडीच्या पदरानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.
नालासोपारा (पालघर) : आईच्या साडीच्या पदरानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील हायवे जवळील पेल्हार येथील बटरपाडा येथे ही घटना घडली. राकेश हरीलाल यादव असे या मृत मुलाचे नाव होते. 12 वर्षीय राकेश सहावीत शिकत होता. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास राकेश घरी परतला. घरी परतल्यावर झोपाळ्यावर खेळत होता. त्याच झोपाळ्याचा फास आवळला आणि त्यातच राकेशचा जीव गेला. राकेशच्या आईच्या जुन्या साडीचा हा झोपाळा तयार करण्यात आला होता. ही घटना घडली, त्यावेळी घरात कुणीही नव्हतं. वडील कामानिमित्त घराबाहेर होते, तर आई घरातील सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. तर त्याची दोन्ही भावंडं शाळेतच होती. राकेशला झोपाळ्याचा फास आवळल्याचं शेजाऱ्यांना लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी तातडीने राकेशला हायवेजवळील रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे राकेशला मृत घोषित करण्यात आले.