खरंतर काल संध्याकाळी 5 वाजता ही यादी जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे यादी जाहीर करण्यास उशिर झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर उशिरा यादी जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांचेदेखील हाल झाले. दरम्यान, मध्यरात्री जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना 11 ते 13 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.
यंदा जास्त गुण मिळल्याने पहिल्या यादीचा कट ऑफ किती असणार याकडे सर्वंचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मुंबईतील कॉलेजचे कट ऑफची आकडेवारी एबीपी माझाला मिळाली आहे.
मुंबईतील टॉप महाविद्यालयांच्या पहिल्या यादीचे 'कट ऑफ' :
वझे-केळकर कॉलेज, मुलुंड
- सायन्स - 92.8 टक्के
- कॉमर्स - 89.6 टक्के
- आर्ट्स - 85 टक्के
के सी कॉलेज
- सायन्स - 85.40 टक्के
- कॉमर्स - 88.80 टक्के
- आर्ट्स - 82.83 टक्के
मिठीबाई कॉलेज
- सायन्स - 85.17 टक्के
- कॉमर्स- 87.6 टक्के
- आर्ट्स - 83.8 टक्के
रामनारायण रुईया कॉलेज
- सायन्स - 92.80 टक्के
- आर्ट्स - 90.60 टक्के
रुपारेल कॉलेज
- सायन्स - 91.2 टक्के
- कॉमर्स - 87.57 टक्के
- आर्ट्स - 82.8 टक्के
साठ्ये कॉलेज कट ऑफ
- सायन्स - 91 टक्के
- कॉमर्स - 86.2 टक्के
- आर्ट्स - 72 टक्के