मुंबई : पश्चिम लोअर परेलच्या पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी 11 तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.


मेगाब्लॉकच्या काळात लोअर परेल ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीतून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. शिवाय, ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे मार्गवरील एकूण 205 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.


शनिवारी म्हणजेच 2 फेब्रुवारीला चर्चगेट स्थानकातून शेवटची धीमी लोकल रात्री 9 वाजून 39 मिनिटानी सुटेल. बोरीवलीला ही लोकल रात्री 10 वाजून 46 मिनिटांनी पोहोचेल. तर शेवटची जलद लोकल चर्चगेट येथून रात्री 9 वाजून 44 मिनिटांनी सुटेल. ती बोरीवली येथे रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल.


शेवटची धिमी लोकल बोरीवली येथून रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी सुटेल. ती चर्चगेट येथे रात्री 10 वाजून 3 मिनिटांनी पोहोचेल. शेवटची जलद लोकल विरार येथून रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी सुटेल. ती चर्चगेट येथे रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी पोहोचेल.


कोणत्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत?


2 फेब्रुवारी


- मुंबई सेंट्रल-अहमदाबाद पॅसेजर

- मुंबई सेंट्रल-इंदूर दुरंतो एक्स्प्रेस


- मुंबई सेंट्रल-राजकोट दुरंतो एक्स्प्रेस


- अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजर


- राजकोट-मुंबई सेंट्रल दुरंतो


3 फेब्रुवारी


- मुंबई सेंट्रल-अहमदाबाद गुजरात एक्स्प्रेस


- मुंबई सेंट्रल-वलसाड फास्ट पॅसेंजर


- वलसाड-मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर


- गुजरात क्वीन एक्स्प्रेस


- इंदूर-मुंबई सेंट्रल-दुरंतो एक्स्प्रेस