नवी मुंबई : तंबाखू , सिगारेट किंवा तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी टाटा स्मारक केंद्रात ‘तंबाखू मुक्ती सेवा केंद्र’ची सुरुवात करण्यात आली आहे. हे केंद्र खारघर सुरु झाले करण्यात आले आहे.

तंबाखू मुक्ती सेवा हि हेल्पलाईन आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली  यांच्या मदतीने सुरु करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना तंबाखू , सिगारेट किंवा तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन सोडवण्य़ाची इच्छा असल्यास त्यांनी  '1800-11-2356' या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.  या क्रमांकावरुन व्यसन सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. मराठी, हिंदी आणि  इंग्रजी या भाषांमध्ये मार्गदर्शन मिळेल.

भारत सरकारच्या नवीन नियमानुसार '1800-11-2356' हा  टोल फ्री क्रमांक सर्व तंबाखू जन्य पदार्थांच्या उत्पदनांवर  छापणे कंपन्यांसाठी बंधनकारकअसणार आहे.

जागतिक तंबाखू सर्वेक्षणानुसार भारतात तंबाखू , सिगारेट किंवा तंबाखू जन्य पदार्थ खाणाऱ्यांचे प्रमाण 29 टक्के आहे. त्यात  असंसर्गजन्य आजारांमुळे असणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांमध्ये 22.4 टक्के तर महिलांमध्ये 7.3 टक्के आहेत. यांमुळेच तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सोडवण्यासाठी सखोल मार्गदर्शनाची गरज आहे.

आज  डॉ. संदिप गुप्ता संचालक एट्रेक यांच्या हस्ते या केंद्राचे  उद्घाटन झाले. डॉ. राजेंद्र दिक्षित संचालक व डॉ. पंकज चतुर्वेदी सहसंचालक सेंटक फॉर कॅन्सर ईपिडेमिओलोजी हेही उपस्थित होते.