मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्मारकाचं बांधकाम एमएमआरडीए करणार आहे. सुरुवातीला खर्च एमएमआरडीए करणार असून नंतर सरकार तो खर्च देणार आहे.


बाळासाहेब ठाकरे यांची उद्या म्हणजे 23 जानेवारीला जयंती आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य तसेच शिवसेनेच्या प्रमुख्य नेत्यांच्या उपस्थितीत गणेश पुजनानं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा श्रीगणेशा होणार आहे. तसेच उद्याच महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कमी पडली असती. म्हणून बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे.


संबंधित बातम्या


23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा श्रीगणेशा